महापौर मांजर !

टॉकटीना दि.१६ – संयुक्त राज्य अमेरिकेच्या  अलास्का प्रांतातील  टॉकटीना हे छोटसे शहर . हे शहर तीन नद्या सुसितना, चुलीटना आणि  टॉकटीनाच्या  संगमावर वसले आहे. यात विशेष काहीच नाही. कारण जगातील इतर अनेक शहरे नद्यांच्या संगमावर वसली आहेत. मात्र या शहरावे वेगळेपण असे की, गेल्या १५ वर्षांपासून या शहरातील महापौराच्या  खुर्चीवर चक्क एक मांजर विराजमान आहे. होय मांजर!  या मांजरीचे नाव आहे  स्टब्बस. ती येथील महापौर आहे.

असे सांगितले जाते की, गेल्यावेळी जेव्हा येथे निवडणूक झाली होती तेव्हा येथील रहिवाशांनी निवडणुकीतील सर्व उमेदवारबद्दल नापसंती व्यक्त करून या मांजरीला आपले प्रतिनिधी निवडले होते.