बाळासाहेबांची प्रकृती स्थिर

मुंबई १७ नोव्हेंबर-आज दिवसभर शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत होतं. यावरच थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वतः शिवसैनिकांशी संवाद साधत यावर शिक्कामोर्तब केलंय.

’कालपासून आजपर्यंत शिवसेनाप्रमुखांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. त्यामुळे मी काल जे बोललो तेच आजही सांगणार आहे… मी अजूनही आशा सोडलेली नाही. देवावर आमचा विश्वास आहे, देव त्यांना नक्की बरं करणार… आपण सगळे प्रार्थना करतोय, ही शत्त*ी नक्कीच आपल्या ’देवाला’ संकटातून बाहेर काढणार’ असं स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी कलानगर परिसरात उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.

देशाला बाळासाहेबांची गरज – अण्णा

’या देशाला बाळासाहेबांची गरज आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करतोय’ अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिलीय.

शिवसेनाप्रमुखांची प्रकृती स्थिर आहे आणि ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. तसंच बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं आज शिवसेनेकडून जाहीर करण्यात येतंय. गेले दोन दिवस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावली होती. बाळासाहेबांच्या प्रकृती खालावल्यामुळे मुंबईसह राज्यात चिंतेचे वातावरण आहे. बाळासाहेबांबद्दल बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ’बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती बिघडलीय. पण मी देवाकडे त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना करणार आहे. कारण, सध्याच्या राजकारणात युवकांची भाषा जर कुणाला समजली असेल तर ते बाळासाहेब आहेत, असं मी मानतो’ या शब्दात अण्णांनी बाळासाहेबांविषयी आपली भावना व्यत्त* केलीय.

उल्लेखनीय बाब म्हणजे, लोकपालच्या मुद्यावरून बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णा हजारेंवर जोरदार टीका केली होती. अण्णा म्हणजे परदेशी पैशावर नाचणारे मोर आहेत, अशा शब्दांत बाळासाहेबांनी अण्णांवर टीकेची झोड उठविली होती.

Leave a Comment