शाहरुखने बोलावले नाही काजोलला

सुपरस्टार शाहरुखचा नवीन सिनेमा असलेला ‘जब तक है जान’ चा सिल्वर स्क्रीनपर्यंत लवकरच पोहचणार आहे. सिनेमा रिलीज होण्यास आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. या सिनेमाचा १२ नोव्हेबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्रैंड प्रीमियरचे निमंत्रण शाहरुखने काजोलला दिले नसल्याचे समजते.

यश चोप्राची पत्नी पाम चोप्रा काही दिवसापूर्वीच प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाली, ‘यश चोप्रा यांना श्रद्धांजली वाहन्यासाठी ‘जब तक है जान’ चा ग्रैंड प्रीमियर आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी आदित्य व उदय सध्या तयारी करीत आहेत.’ या प्रीमियरमध्ये सहभागी होणा-यात यशराज बैनरच्या टॉप हीरोइन्स माला सिन्हा, साधना, शर्मिला टागोर, राखी, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, कैटरीना आणि अनुष्का शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. यशराज बैनर या प्रोग्रामसाठी कुठल्याही लीडिंग लेडीला मिस करणार नाही.

सध्या अशी चर्चा आहे की, शाहरुखसोबत कित्येक ब्लॉकबस्टर्स सिनेमात काम केलेली अभिनेत्री काजोल ही सूद्धा सहभागी होणार आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून यशराज फिल्म्स आणि अजय देवगन यांच्यातील वादामुळे अजून तरी या कार्यक्रमात काजोल सहभागी होणार की नाही याबाबत काहीच कल्पना नाही. मात्र सूत्राने दिलेल्या महितिनुसार शाहरुखने काजोलला या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही.

Leave a Comment