मोटरसायकल, मैत्रीण व मोबाईलमुळेच अपघात

नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर-बसपाच्या एका खासदाराने मुलींना मोबाईल फोन देऊ नका, असे विधान करुन एका नव्या वादाला तोंड फोडले असताना आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह यांनी देशात वाढत्या अपघाताचे कारण मोटरसायकल, मैत्रीण आणि मोबाईल फोन असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले आहे. चांगली बाईक, भारीतला मोबाईल आणि सुंदर गलफ्रेंड असेल तर अपघात होणारच, असे त्यांनी म्हटले.

रायपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान या वैद्यकीय महाविद्यालयात रस्ता सुरक्षा विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलताना रमन सिंह यांनी हे वक्तव्य केले. रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणार्‍या नागरिकांपैकी ६० टक्के हे युवक असतात. दुचाकी चालवताना युवक सर्रास मोबाईलवर बोलताना दिसतात.

चेहरा दिसावा म्हणून तरूण हेल्मेट घालत नाहीत. आणि मुली मात्र आपला चेहरा लपवण्यासाठी स्कार्फ बांधतात. बाईक चालवणारा एका हाताने मोबाईलवर बोलतो. दुसर्‍या हाताने स्पीड वाढवतो. यादरम्यान भांडण झाले तर तो ब्रेक दाबणार मग धडक होणारच, अशी अनेक उदाहरणे देत सिंह यांनी अपघाताची कारणे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यासाठी दिलेली वादग्रस्त उदाहरणे त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. वाढते रस्ते अपघात आणि बचावासाठी प्रभावी उपाय याविषयावर मेडिकल इन्सिट्टयूट येथे आयोजित एका कार्यशाळेत ते बोलत होते.

ते म्हणाले, गेल्या चार-पाच महिन्यांपासून या अपघातांचा मी अभ्यास करण्यात करत होतो. जेवढे अपघात झाले. त्यापैकी ५५ टक्के वाहने तरूण चालवत होते. या अपघातांचे फत्त* एक कारण आहे- वेग. तरूण हेल्मेट घालत नाहीत. त्यांना ते फॅशनच्या विरूद्ध वाटते. मुली आपला चेहरा लपवण्यासाठी स्कार्फ बांधतात. बाईक चालवणारा एका हाताने मोबाईलवर बोलतो. दुसर्‍या हाताने स्पीड वाढवतो. यादरम्यान भांडण झाले तर तो ब्रेक दाबणार मग धडक होणारच. दुर्घटनेचे अनेक कारणे असतात. त्यापैकी हे एक महत्वाचे कारण आहे. आम्ही उत्कृष्ट रस्ते केले. आम्हाला वाटले, आता चांगले होईल. मात्र, आश्चर्य वाटेल चांगल्या रस्त्यांमुळेच अधिक अपघात होत आहेत.

काही महिन्यांपूर्वी बागपतमधील खाप पंचायतीने प्रेमविवाहांवर बंदी घालत ४० वर्षाखालील महिलांना खरेदीसाठी घराबाहेर पडण्यास तसेच घराबाहेर मोबाईल फोन वापरण्यास बंदी घातली होती. त्यानंतर बसपचे राज्यसभेतील खासदार राजपाल सिंग सैनी यांनीही अशाच पध्दतीची विधाने केली आणि आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह यांनीही तशीच खळबळजनक वत्त*व्य केली आहेत.

Leave a Comment