पुण्याचे साखळी चोऱ्या चे रेकॉर्ड

पुणे दि.१० – यंदाच्या वर्षात गेल्या दहा महिन्यातच तब्बल ४०० साखळी चोर्यांसच्या घटना नोंदवून पुण्याने साखळी चोरींचे नवे रेकॉर्ड केले आहे. पोलिस आयुक्तांकडील आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. सोने दरातील प्रचंड वाढीमुळे आणि या चोऱ्या करण्यास अन्य चोर्यां च्या तुलनेत सोपे असल्याने हे गुन्हे घडत असल्याचे विश्लेषणही पोलिसांनी केले आहे.

गेल्या दोन दिवसांत साखळी चोरीच्या तब्बल सात घटना शहरात घडल्या आहेत. कोथरूड, भोसरी, दत्तवाडी, सदाशिव पेठेत या घटना घडल्या आहेत. कोथरूड परिसरात आक्टोबर अखेरपर्यंत तब्बल ५४ साखळी चोऱ्या , झाल्या असून हेही एक रेकॉर्डच आहे. गतवर्षी याच काळापर्यंत शहरात २९६ घटना घडल्या होत्या त्यातील १९२ चोऱ्याचा तपास लागला असल्याचे पोलिस उपायुक्त गुन्हे विभाग विनोद सातव यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की यंदाही अनेक संशयितांना आम्ही अटक केली आहे मात्र नेहमीच्या गुन्हेगाराबरोबरच अनेक नवीन गुन्हेगारही यात आढळले आहेत. साखळी चोरी ही तुलनेने सोपी आहे आणि चोरीच्या मालाचा पैसा लगेच मिळतो. त्यातून सोन्याचे भावही गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे चोरांची असल्या चोऱ्यांमुळे चांगली कमाई होते.

साखळी चोरीच्या घटना कोथरूड, वारजे, स्वारगेट, हडपसर, येथे सर्वाधिक प्रमाणात होत असून चोरटे प्रामुख्याने ५० वर्षांवरील महिलांना टार्गेट करत आहेत. या चोर्याा सकाळी महिला फिरायला जातात तेव्हा आणि सायंकाळी गर्दी कमी होते तेव्हा होत आहेत. यावर उपाययोजना म्हणून पोलिसांची पायी गस्त वाढविली गेली आहे तसेच महिलाना दागिने घालून बाहेर पडू नये अशा सूचनाही वारंवार दिल्या जात आहेत.

पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाबराब पोळ म्हणाले, साखळी चोऱ्या ना आळा घालण्यासाठी लवकरच विशेष अभियान राबविले जाणार असून त्यात स्थानिक गणपती मंडळाच्या सदस्यांचे सहाय्य घेतले जाणार आहे. पोलिसांची संख्या कमी असल्याने सगळीकडे पहारा शक्य होत नाही मात्र अन्य पोलिस मुख्यालयांबरोबर मागच्या गुन्ह्यात पकडल्या गेलेल्याची माहिती तसेच फोटो शेअर केले जात आहेत.

Leave a Comment