२०१२ हे वर्ष बॉलिवुडसाठी ‘इयर ऑफ मैरिज’ ठरणार असे सध्या तरी दिसतआहे. मिळालेल्या माहितीनुसार करीना व सैफच्या लग्नानंतर बॉलिवुडमध्ये आणखीन एक हाई-प्रोफाइल लग्न या वर्षातच होत आहे. डर्टी गर्ल विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय-कपूर डिसेबरमध्ये लग्न करणार असल्याचे समजते.
विद्याचा दिवाळी धमाका; डिसेबरमध्ये करणार लग्न
काही दिवसापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेजण फेबुवारी २०१३ मध्ये लग्न करणार होते. मात्र हा प्लान त्यांनी बदलला असून पुढच्या महिन्यात ते लग्न करणार आहेत. याबाबत, विद्या अथवा गेल्या दोन वर्षापासून तिचा बॉयफ्रेंड असलेला सिद्धार्थ रॉय कपूरने या वृत्ताला दुजोरा दिला नाही. मात्र सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार विद्याने राजकुमार गुप्ताच्या ‘घनचक्कर’ या शूटिंगच्या प्रोग्रममधून डिसेबरमध्ये ब्रेक घेतला आहे. तर दुसरीकडे यूटीवी डिज्नीचा सीईओ सिद्धार्थ राय- कपूरने पण डिसेबर महिन्यात सुट्टी घेतली आहे. याशिवाय या दोघानी लग्नानंतर हनीमूनसाठी कैरेबियन बेटची निवड केली आहे. त्या ठिकाणी जाण्याचे बुकिंग ही दोघांनी केले आहे. त्यामुळे डिसेबरमध्ये लग्न करणार हे निश्चित मानले जात आहे.
कैरेबियन बेटावरील हनीमूनवरून परत आल्यानंतर दोघेपण जूहू मधील नवीन अपार्टमेंटमध्ये राहन्यासाठी शिफ्ट होणार असल्याचे समजते. तसे पहिले तर सिद्धार्थ कपूर हा विवाहित आहे. त्यामुळे त्याला पहिल्या पत्नीपासून अजून घटस्फोट घ्यावयाचा आहे. त्यानंतरच त्याला विद्या सोबत लग्न करता येणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया एका महिन्यात शक्य नसल्याने पुढील महिन्यात हे लग्न करणे शक्य नसल्याचे काही जनाचे मत आहे.
