नवी दिल्ली,१२ नोव्हेंबर-काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांचे डोकं फिरलेय असा प्रतिहल्ला, राखी सावंत हिने केला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी नव्याने वादग्रस्त केले. केजरीवाल यांच्यावर टीका करताना दिग्विजय सिंह यांनी त्यांची तुलना राखी सावंतशी केली आहे.
अरविंद केजरीवाल आणि राखी सावंत हे दोघे सारखेच आहेत.
हे दोघ एक्सपोज करण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्याचा काहीच उपयोग होत नाही असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. टिवटरवर त्यांनी ही तुलना केली आहे.
यानंतर कॅमेर्यावर बोलताना मात्र त्यांनी काहीशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. कोलबिंया विद्यापीठातल्या एका विद्यार्थ्यानं आपल्याला हा मेसेज पाठवल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.
दिग्विजय सिंह यांच्या या वत्त*व्याचा केजरीवाल यांचे सहकारी कुमार विश्वास यांनी निषेध केला आहे. हे विधान करुन त्यांनी महिलांचा अपमान केल्याचे कुमार विश्वास यांनी म्हटले आहे.केजरीवाल यांच्याशी तुलना केल्यानं राखी मात्र चांगलीच भडकली आहे. दिग्विजय सिंह यांचे डोकं फिरलेय, असे राखी सावंतने म्हटले आहे.