जनलोकपाल आणा, अन्यथा निदर्शने झेला : अण्णा हजारे

नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर-सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर लोकपाल विधेयकावरून ’धोका’ दिल्याचा आरोप करून आज इशारा दिला की, २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकपूर्वी पारित केले नाही तर ते पुन्हा निदर्शने करतील. दक्षिण दिल्लीचे सर्वोदय एनक्लेवमध्ये आपल्या नवीन कार्यालयाचे उद्धाटन करताना अण्णा हजारे म्हणाले लोकपाल विधेयक २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकपूर्वी पारित झाले नाही तर आम्ही रामलीला मैदानात आणखी एक रॅली काढू.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर धोका देण्याचा आरोप लावून त्यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी भ्रष्टाचार विरोधी विधेयक संसदेने पारित करण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्यांनी आपले आश्वासन पूर्ण केले नाही. लोकपाल विधेयकासाठी आमचा संघर्ष तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत सरकार याला पारित करत नाही. मी देशभरात मोहिम चालवेल आणि लोकांना याबाबत जागृत करण्याचे प्रयत्न करीन. मी परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न करीन. राजकीय नेत्यांवर हल्लाबोल करून अण्णा हजारे म्हणाले देशात नेतृत्वाचा अभाव आहे.

ते पुढे म्हणाले, आम्ही घरोघरी जाऊन भ्रष्टाचार विरोधात लोकांना जागृत करण्याची वेळ आली आहे. आम्हाला देशाला भ्रष्टाचार मुत्त* बनवण्यासाठी काम करावे लागेल.

Leave a Comment