इंग्लंड विरुद्धच्या आगामी टेस्ट सीरीजसाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियाचा मुंबई येथे कसून सराव सध्या सुरु आहे. हे शिबीर तीन दिवस चालणार आहे. तीन दिवसीय शिबीरात भारतीय टीमचे कोच डंकन फ्लेचर खेळाडूकडून सराव करून घेत हेत. या सराव शिबिरानंतर टीम इंडिया १२ नोव्हेंबर रोजी अहमदाबादला रवाना होणार आहे.
कोच डंकन फ्लेचर, गोलदाजीचे कोच जो डावेस आणि फिल्डिंग कोच इवान स्पिचले सध्या टीम इंडियाचा कसून सराव घेत आहेत. १५ नोव्हेंबर रोजी सुरु होणा-या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सर्वच फलंदाज नेटमध्ये सराव करीत असताना फॉर्ममध्ये दिसत होते. सगळ्याचे लक्ष रणजी सामन्याच्या वेळी जखमी झालेल्या जलदगती गोलंदाज जहीर खान याच्याकडे लागले होते. त्याने पण आज नेटमध्ये गोलदाजीचा सराव करून फिट असल्याचे दाखवून दिले. खुप दिवसाच्या विश्रांतीनंतर टीम इंडियामध्ये सहभागी झालेला अनुभवी स्पिनर हरभजन सिंह मात्र सराव करतना दिसला नाही. त्याची फ्लाइट उशिरा येत असल्याने तो शिबीरात उशिरा सह्भागी होणार असल्याचे समजले. त्याच्याकडे सरावासाठी अजून दोन दिवस आहेत.
तीन दिवसाचे हे शिबीर पूर्ण झाल्यानंतर टीम इंडिया १२ नोव्हेंबर रोजी अहमदाबादला रवाना होणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी येथील मोटेरा स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध पाहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे.