काही दिवसापूर्वीच बॉलीवूडमधील प्रसिद्ध डायरेक्टरने त्यांच्या आगामी काळात येत असलेल्या ‘डर्टी पिक्चर’ मध्ये कैटरीना कैफने काम करावे यासाठी तिची भेट घेतली. तसे पहिले तर तिचा सलमान खान सोबतचा ‘एक था टायगर ‘ हा सिनेमा हिट झाल्यापासून ती फॉर्ममध्ये आहे. एका पाठोपाठ एक असे तिचे तीन सिनेमे आगामी काळात येत आहेत. त्यामुळे तिचे शेडूल सध्या तरी बीजी आहे. त्यामुळेच सध्या तिच्या घरी डायरेक्टर मंडळीची दररोज रांग लागलेली असते. आगमी काळात येत असलेल्या या ‘डर्टी पिक्चर’ मध्ये काम करण्यास कैटरीनाने होकार दर्शविला असल्याचे समजते.
आता कैटरीना करणार ‘डर्टी पिक्चर’
सूत्रोंने दिलेल्या महितिनुसार या डर्टी सिनेमाचे डायरेक्टर दुसरे तिसरे कोणी नसून मिलन लुथरिया हे आहेत. इंडस्ट्रीमधील नामवंत डायरेक्टर सोबत काम करण्याची कैटरीनाची ब-याच दिवसापासूनची इच्छा होती. त्यामुळे कैटरीनाने लगेचच मिलनच्या सिनेमात काम करण्यास होकार दर्शविला असल्याचे समजते. मिलनाच्या ‘डर्टी पिक्चर’ मध्ये काम केल्याने अभिनेत्री विद्या बालन एका रात्रीत स्टार झाली होती.
सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसापुर्वी मिलन हा त्याचा नविन प्रोजेक्ट घेऊन कैटरीनाकडे गेला होता. त्यामुळे कैटरीनाने या सिनेमात काम करण्यास लगेचच होकार दर्शविला. आगामी काळात कैटरीना मिलनच्या या सिनेमात कशा प्रकारे रोल करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्यांदाच या दोघांची जोडी एकत्र काम करीत असून त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हे दोघे काय चमत्कार दाखविणार यासाठी अजून काही दिवस वाट पाहवी लागणार आहे.
