काही दिवसापूर्वीच करीना कपूर जरी सैफची बेगम झाली असली तरी तिने पूर्वीचे काम काही सोडले नाही. काही दिवसापूर्वीच ती छम्मक छल्लो आणि हलकट जवानी या गाण्यावर आयटम सॉन्गवर थिरकताना दिसली. त्यासोबातच तिने दबंग-२ या सिनेमात सुद्धा तिने सलमान सोबत आयटम सॉन्ग सदर केले आहे. या आयटम सॉन्गची अजून चर्चा कमी झाली नाही, तोपर्यतच करीना आता दर्शकासमोर नव्या अवतारात दिसणार आहे.
करीना कपूर तिच्या आगामी काळात येऊ घातलेल्या ‘सत्याग्रह’ या सिनेमात टीवी जर्नलिस्टचा रोल करणार आहे. सोर्सने दिलेल्या माहितीनुसार करीना कपूर प्रकाश झा च्या ‘सत्याग्रह’ या सिनेमात टीवी जर्नलिस्टची भूमिका साकारणार आहे. हा रोल प्रामुख्याने दबंग तरुणीचा असणार असल्याचे समजते. या रोलमध्ये ती सलवार-कमीज आणि खूप कमी मेकअपमध्ये दिसणार आहे. यापूर्वी तीने डायरेक्टर गोविंद निहलानीच्या ‘देव’ या सिनेमात असाच प्रकारचा रोल केला आहे. तिचा हा पूर्वीचा रोल अनेकजणांना आवडला होता. त्यामुळे ती अशा प्रकारचा रोल करणार असल्याचे समजते.
बेबो हा रोल एक्सपेरिमेंट रोल म्हणून करीत आहे . ‘सत्याग्रह’ या सिनेमात बेबोचा रोल जरी ठरला असला तरी या सिनेमात इतर स्टार मंडळी कोण कोण काम करणार हे मात्र अजून ठरलेले नाहीत. या सिनेमाचे शूट येत्या काही दिवसात सुरु होणार आहे.