लग्नानिमीत येणार शाहरुख, सलमान व अजय एकत्र

सिनेनिर्माता रोहित शेट्टीची बहिण महक शेट्टीचा लग्न होत आहे. यानिम्मित बॉलीवुडमधील दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहे. रविवारी होणा-या या लग्न समारंभास बॉलीवूडमधील शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगन, अभिषेक बच्चन आणि अक्षय कुमार ही दिग्गज मंडळी एकत्र येणार आहे. सध्या या स्टार मंडळीत बिनसले आहे. या लग्नाच्या निम्मिताने ही स्टार मंडळी एकत्र येत असल्याने सर्वाना याबाबत उत्सुकता लागली आहे.

शाहरुख खान सध्या ‘जब तक जान’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे तो या कामातून वेळ काढून तो लग्नास उपस्थित राहणार आहे. शाहरुख आणि अजय देवगन यांच्यातील संबध गेल्या काही दिवसापासून ताणले गेले आहेत. शाहरुखचा ‘जब तक जान ‘ आणि अजय देवगनचा ‘सन आफ सरदार’ दीवाळीत रिलीज होणार आहे. अक्षय कुमारने दिवाळीत रिलीज होणारा त्याचा ‘खिलाड़ी ७८६’ सिनेमा पुढे ढकलला आहे. दिवाळीत शाहरुख खान आणि अजय देवगन यांच्यामध्ये या निमित्ताने टक्कर होणार आहे.

अजय देवगन आणि रोहित शेट्टी जवळचे दोस्त आहेत. दोघांनी सोबतच आठ सिनेमामध्ये काम केले आहे. ज्या मध्ये पाच सिनेमा हे ब्लाकबस्टर आहेत. महकच्या लग्नासाठी अजय येणार हे नक्की मानले जात आहे कारण महकला तो बहिण मानतो. महकचे लग्न डिजाइनर असलेल्या नवीन शेट्टी सोबत होत आहे.