झोपड़पट्टीत दिसला आमिर खान

खरे पहिले तर इंडस्ट्रीज मधील स्टार मंडळी नेहमीच प्राइवेसीच्या बाबतीत टेंशनमध्ये असतात. ही मंडळी नेहमीच पर्सनल लाइफमधील काही गोष्टी सांगत ही नाहीत आणि पुढे येऊ पण देत नाहीत. एवढेच नव्हे तर या गोष्टी ते कोणासोबत शेयर ही करीत नाहीत आणि कोणाला जवळ येवूही देत नाहीत. हे फिल्मस्टार्स शूटिंगच्यावेळी सुद्धा फैन्सपासून दूर राहणेच पसंत करतात. त्यामुळेच काही बॉलिवुड सिलेब्स सिक्युरिटीसाठी बॉडीगार्ड्स सुद्धा ठेवतात. मात्र याबाबतीत आपले मिस्टर परफेक्शनिस्ट असलेला आमिर खान मात्र थोडासा वेगळा आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी रीमा कागजिचा डायरेक्ट केलेला सस्पेंस थ्रिलर ‘तलाश’ या सिनेमाचे शूट मुंबई सेंट्रलच्या झोपड़पट्टीच्या एरियात सुरू होते. सेटवर ब्रेक झाल्यानंतर आमिर शूटिंग पाहण्यासाठी आलेल्या नागरिकाना भेटतो हे त्याचे विशिष्ट आहे. यावेळी तो त्यांची नावे देखील विचारात असतो. कधी कधी त्यांच्या सोबत तो गप्प मारतो, हे सर्व काही ठरलेले आहे. यावेळी त्यठिकाणी उपस्थित असलेल्या काहीजननी आमिर खानला घरी येण्याचे निमंत्रण सुद्धा दिले. त्यावेळी आमिर खान हा त्यांच्या सोबत घरी पण गेला आणि चहा नाष्टा सुद्धा त्यांनी केला.

या झोपड़पट्टीच्या एरियात ‘तलाश’ सिनेमाची शूट सुरु होते. त्यावेळी येथील स्थानिक नागरिकांनी खूप सहकार्य केले होते. त्यामुळेच आमिरने स्थानिक नागरिकांनी दिलेले निमंत्रण स्वीकारले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आमिरने स्थानीक नागरिकांचे निमंत्रण स्वीकारले आणि त्यांच्या घरी जाऊन नाष्टा सुद्धा केला. आमिर खान हा मिस्टर परफेक्शनिस्टच नाही तर तो चाहत्याची मन सुद्धा जिंकतो. त्यामुळेच तो शूटमधून वेळ काढून झोपड़पट्टी मधील नागरिकांना नुसता भेटलाच नाही तर त्यांच्या सोबत त्याने चहा नाष्टा सुद्धा केला.