अदभूत लाईट बल्ब

जगाच्या पाठीवर कुठेही असलात तरी आपल्या घरातील लाईट बल्ब बंद करणे, चालू करणे, त्याचा रंग बदलणे किंवा त्याच्या प्रकाशाची तीव्रता कमी जास्त करणे आता शास्त्रज्ञांच्या संशोधनातून शक्य झाले असून या सर्व सुविधा देणारा अद्भूत लाईट बल्ब प्रसिद्ध फिलिप्स कंपनीने बाजारात आणला आहे. ब्रॉडबँड नेटवर्कला कनेक्ट असलेला हा बल्ब आयफोन युजर वापरू शकणार आहेत. ह्यू लाईट बल्ब असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे आणि त्याची किंमत आहे १७९ पौंडस. अर्थात या किमतीत ब्रॉडबँड कनेक्शन तसेच तीन बल्ब मिळणार आहेत आणि हे बल्ब नेहमीच्या दिव्यापेक्षा वीस टक्के वीज बचत करतात असा कंपनीचा दावा आहे..

पन्नास वॅटचा हा एलइडी बल्ब केवळ तुमची वीजच वाचविणार नाही तर तुम्ही सुट्टीवर गेला असलात तर तुमच्या घराचे चोरांपासून रक्षणही करणार आहे. तुम्ही कुठेही असलात तरी तुमच्या आयफोनवरून तुम्ही घरातले दिवे सुरू करणे बंद करणे, प्रकाश कमी जास्त करणे ही कामे करू शकणार असल्याचे चोरांचा हुलकावणी मिळणार आहे असे कंपनीचे म्हणणे आहे. दिवे लागतात, बंद होतात, प्रकाश कमी जास्त होतो म्हणजे घरात कुणीतरी असणार असे चोरांना वाटेल आणि ते तुमच्या घरात शिरणार नाहीत असे लॉजिक यात मांडण्यात आले आहे.

सध्या हे बल्ब सर्व अॅपल स्टोअर्समध्ये उपलब्ध करून देण्यात आले असून त्यात लाईट रेसिपीज थीमही देण्यात आली आहे. या थीमप्रमाणे या दिव्यांचे रंग तसेच तीव्रता बदलून तुमच्या शरिरातील अवयव त्याला कसा प्रतिसाद देतात हेही नोंदविता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे