‘रेस-२’ चा फर्स्ट लुक प्रसिद्ध

बॉलीवुड मधील स्टार अभिनेता सैफ अली खान आणि एक्ट्रेस दीपिका पादूकोण यांचा आगमी काळात येत असलेल्या ‘रेस-२’ चे फर्स्ट लुक प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘रेस-२’ या सिनेमाचे सैफ व दीपिका असलेले दोन वेगवेगळे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

हा दीपिका आणि सैफचा एक्शन आणि थ्रिलर सिनेमा आहे. ‘ रेस-२’ या बहुचर्चित सिनेमाबाबत बोलताना दीपिका म्हणाली, ‘ माझा हा पहिलाच एक्शन आणि थ्रिलर सिनेमा आहे. त्यामुळे मी खूपच एक्साइटेड आहे. या सिनेमातील स्टंट मीच केले आहेत. यापूर्वी अक्षय कुमार सोबत ‘चांदनी चॉक टू चाइना’ या एक्शन सिनेमात काम केले होते. त्या सिनेमाचा अनुभव पाठीशी असल्याने, या सिनेमात काम करीत असताना माझे कान्फिडेंस वाढले. त्यामुळे त्या अनुभवाचा मला फायदा झाला.’

‘रेस-२’ या सिनेमाच्या शूटच्या वेळी दीपिका थोडीसी नर्वस होती. मात्र सिनेमाच्या निर्मात्याने तिला शूट बाबत काही टिप्स दिल्याने तिचे कान्फिडेंस वाढले. त्यानंतर तिने या सिनेमासाठी काही बेस्ट शॉटस दिले. दोनच दिवसापूर्वी लीड एक्टर सैफ अली खानने फर्स्ट लुक प्रसिध्द केला आहे. या सिनेमात सैफ, दीपिका सोबतच जॉन अब्राहम, बिपाशा बसु, जैकलीन फर्नाडिस, चित्रागदा सिंह आणी अमीषा पटेल काम करीत आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच २५ जानेवारी २०१३ला रिलीज होणार आहे.

Leave a Comment