धर्माधिष्ठीत सॉफटवेअर उद्योग गाठणार २ लाख कोटींचा पल्ला

नवी दिल्ली दि.७ – आय टी क्षेत्रासाठी नवनवीन बाजारपेठा शोधल्या जात असतानाच आता जगभरातील विविध धर्मांसंबंधीच्या सॉफ्टवेअरचा व्यवसाय विकसित होताना दिसून येत असून २०१७ सालापर्यंत सॉफटवेअर आणि सेवा उद्योग २.१८ लाख कोटींचा व्यवसाय करेल असे गार्टर या संशोधन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

जगभरात धर्मवेड्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे आणि रिलीजन बेस्ड बँकींग, शेअर्स, म्युच्युअल फंड, अर्थसेवा उदयास येऊ लागल्या आहेत. या सर्व व्यवसायांना आधुनिक काळाप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी आणि फास्ट सेवा देण्यासाठी विविध सॉफटवेअर आवश्यक आहेत. त्यातून या संस्थांतून काम करणार्यास लोकांचा विचार केला तर कस्टमाईज्ड सॉफ्टवेअर व अॅप्लिकेशन तयार करावी लागणार आहेत व त्यामुळे आयटी क्षेत्राला व्यवसाय वाढीची मोठीच संधी उपलब्ध होणार असल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

जगभरात धार्मिक स्थळांना भेटी देणार्यांीची संख्याही वेगाने वाढते आहे. या वाढत्या प्रवाशांना चांगली व जलद सेवा देणे गरजेचे बनत चालले आहे. असे सांगून गार्नरचे मुख्य अधिकारी सुरेश रैना म्हणाले की यानिमित्ताने आयटी क्षेत्राला व्यवसायाचा नवीन अपारंपारिक स्त्रोतच उपलब्ध होणार आहे. विशेषतः लॅटिन अमेरिका, अरब जग, दक्षिण आफ्रिका, पोलंड, सौदी, तुर्कस्तान, अर्जेंटिना या देशांतून धर्माचा प्रभाव वाढताना दिसत आहे. त्यातून लोकांचा आर्थिक विकास झाला असल्याने खर्च करण्याची प्रवृत्तीही वाढती आहे. त्यामुळे धर्मसंस्थांचीही कमाई वाढत आहे आणि त्यांना व्यवसाय वाढीसाठी आय टी क्षेत्राची मदत घेण्याची गरज वाढत चालली आहे. या सर्वांच्या परिणामी येत्या पाच वर्षात आय टी धर्माधिष्ठित व्यवसाय कोटींचा पल्ला गाठणार असे म्हणता येते.