तसे पहिले तर यावेळेस नागरिक इको-फ्रेंडली दिवाळी साजरा करण्याच्या मूडमध्ये आहेत, मात्र करीना कपूरचे फटाके मात्र यावेळेस सर्वानाच भुरळ घालत आहेत. प्रत्येकवेळेस बॉलीवूडमधील कोणत्या ना कोणत्या तरी स्टारच्या नावाचे फटाके विक्री होत असतातच यावेळेस मात्र करीनाच्या नावाची चलती दिसत आहे
करीनाचे फटाके महाग
फटाके व्यावसायिकाच्या मते, ‘ करीनाच्या पैकेजिंग आणि पोस्टर असलेले फटाके खरेदी करण्यास नागरिक उत्साह दाखवीत आहेत. यावेळेसच्या दिवाळी बाजारात करीनाशिवाय प्रियंका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, दीपिका पादुकोण, असिन आणि ऐश्वर्या राय यांच्या नावाचे पोस्टर असलेले फटाके सुद्धा विक्रीसाठी आले आहेत, पण नागरिकानी यावेळेस करीना कपूरच्या नावाचे फटाके खरेदी करण्यावर भर दिला आहे.’
गेल्या कित्येक वर्षापासून फटाके विक्रीचा व्यवसाय करणा-या व्यापा-याच्या मते, ‘ करीनाच्या फटाक्यासाठी नागरिक खूपच क्रेजी आहेत. तिच्यामुळे सध्या हॉलिवुड ऐक्ट्रेस ऐंजिलीना जोलीच्या फटाक्याकडे कोणी लक्ष देत नाही. सिलेब्रिटीवाले फटाके ५०० ते १००० रुपये किमतीला मिळत आहेत. मार्केटमध्ये फटाकायचे रेट सुद्धा स्टार्सच्या रेट सारखे आहेत. बॉलिवुडमध्ये त्या रेटिंगला लक्षात घेऊन फटक्याची किमत ठरवण्यात आली आहे. करीनाचे हे फटाके यंगस्टर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत.’
