डेंगीचा धोका वाढतोय

महाराष्ट्रात २००५ साली चिकनगुनियाने थैमान घातले होते. त्यावेळी हजारो लोकांना या विकाराने जखडून टाकले होते. आता असाच प्रकार सुरू झाला आहे आणि तो डेंगीचा आहे. डेंगीच्या आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. तसे तर ते अनेक वेळा त्रस्त असतात पण काही  सेलीब्रिटीजना असा काही विकार जडला की मग त्याचा अधिक गवगवा होतो. आता एक चित्रपट निर्मात्याला डेंगी झाला आणि त्यात त्यांचा अंत झाल्याने डेंगीची चर्चा सुरू झाली. ‘सु’प्रसिद्ध असो की ‘कु’प्रसिद्ध असो पण कसल्या का होईना प्रसिद्ध माणसाला तो झाला की गवगवा होतो. तसा प्रकार झाला आहे आणि सध्या सार्याि देशाचा शत्रू ठरलेल्या अजमल कसाबलाही डेंगी झाला आहे.  केवळ डेंगीच नाही तर अशा साथीच्या रोगांची लागण राज्यात अनेक लोकांना झाली आहे. पंधरा हजारावर लोक घाणीतून पसरणार्यां रोगांनी अंथरुणाला खिळून आहेत. राज्यातल्या घाणीच्या साम्राज्याचे हे परिणाम आहेत. 

गावातल्या सफाईची जबाबदारी नगरपालिकांच्या कर्मचार्यां वर असते पण ते नेमके काय काम करतात यावर कोणाचेही नियंत्रण नाही. गावातील कचर्यांाचे ढीग दररोज उचलले जातात की नाही याची कोणी चिंता करीत नाही.  नागरिकांचेसुध्दा याबाबतीत काही कर्तव्य असते आणि त्यांना ही कामे करवून घेण्याचा अधिकारही असतो. पण ते कर्तव्य आणि अधिकार या दोन्हींचाही वापर करीत नाही. लोकही घरातल कचरा काढून तो कचरा कुंडीत टाकण्याऐवजी रस्त्यावर आणून टाकतात. आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. याची जाणीव त्यांना नाही. शहरात चक्कर टाकली तर जागोजाग साचलेले कचर्यापचे ढीग, गटारीमध्ये पडलेल्या प्लॅस्टीकच्या पिशव्या आणि त्यामुळे तुंबलेल्या गटारी त्याचबरोबर रस्त्यात पडलेले खड्डे, त्यात साचलेले पाणी असे अतिशय ओंगळवाणे दृश्य आपल्याला बघावे लागते. नांदेड महानगर पालिका तर याबाबत जगात क्रमांक एकवर असेल इतक्या या गावातल्या गटारी प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी तुंबलेल्या आहेत. त्यातच महानगर पालिकेने कचरा उचलण्याचा मक्ता खाजगी कंपनीला दिला आहे. या कंपनीचाही अनुभव मनपापेक्षा वेगळा नाही.

सार्याटच नगरपालिका आणि महानगरपालिका राजकारणाचे अड्डे झालेल्या आहेत. काही अपवाद वगळता बहुसंख्य नगरसेवक निवडून येऊन आपल्याला कमाई काय करता येईल याचाच विचार करत असतात. कर्तव्याची जाणीव नसणारे नगरसेवक, अधिकाराची कल्पना नसलेले नागरिक आणि पगाराशी गाठ घालणारी प्रशासन यंत्रणा यांच्या तिढ्यात महाराष्ट्रातल्या सार्वजनिक आरोग्याचे अक्षरशः तीन तेरा झालेले आहेत. डेंगीचे संकट त्यातून निर्माण झाले आहे.   

डेंगीची साथ काही एकट्या मुंबईत किवा महाराष्ट्रात नाही, तिने सार्याा देशालाच ग्रासून टाकले आहे. तिचा प्रसार मोठया शहरांत अधिक आहे आणि देशातली जवळपास मुंबईत गेल्या काही दिवसांत डेंगीचे जवळपास सातशे रुग्ण दाखल झाले आहेत. या आर्थिक राजधानी बरोबरच राष्ट्रीय राजधानीही या साथीने त्रस्त आहे. चालू हंगामात दिल्लीत डेंगी झालेल्या रुग्णांची संख्या ६८५  झाली आहे. त्यामुळे लोकांत मोठी घबराट पसरली आहे. दवाखान्यांत दाखल होणार्याल रुग्णांत श्रीमंत वस्त्यांतल्या लोकांची संख्या मोठी आहे. चेन्नईलाही डेंगीचा त्रास सुरू आहे. तो दिल्ली आणि मुंबईपेक्षा भयानक आहे. गेल्या दोन महिन्यांत एकट्या चेन्नई शहर आणि तामिळनाडूत  पाच हजारावर रुग्णांना डेंगीचे निदान झाले आहे. दक्षिण भारतातल्या पाच राज्यांत १२ हजारावर रुग्ण डेंगीने बाधित झालेले आहेत आणि त्यातल्या  ७७  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  राज्यातल्या अनेक शासकीय रुग्णालयात नाना प्रकारच्या तापाने पछाडलेले पाच लाख लोक गेल्या तीन महिन्यांत दाखल झाले आहेत. पण प्रत्येक ताप हा डेंगीचाच असल्याच्या गैरसमजापोटी लोकांत मोठी घबराट पसरली आहे.

उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातही या साथीचा प्रसार होत आहे.  एकंदरीत आज तरी डेंगी ही सगळ्या देशाचीच समस्या होऊ पहात आहे. डेंगीला ब्रेक बोन फीवरही म्हटले जाते. हा आजार काही विषाणूंमुळे (व्हायरस) होतो. हे विषाणू डासांच्या दंशातून आपल्या शरीरात शिरतात. डेंगीचा व्हायरस एडीस इजिप्टी या डासांमुळे पसरतो.  हा डास दिवसाच चावतो. त्याची वीण स्वच्छ पाण्यात वाढते. आणि तो माणसाच्या शक्यतो जवळ राहतो. त्यामुळे घरात स्वच्छ पाणी साचले असेल तर तिथे या डासांचा प्रादुर्भाव होतो. वातानुकूलन यंत्रणा हे त्यांचे सर्वात उत्तम स्थान. त्यामुळे हा विकार  श्रीमंत लोकांत होतो.  घरातल्या फुलांच्या कुंड्या, मनी प्लँटच्या बाटल्या यामुळेही हा डास वाढतो आणि तो डेंगीचा व्हायरस पसरवतो. डेंगीचा त्रास टळावा यासाठी घराच्या आसपास स्वच्छ पाणी साचत असेल तर ते साचू देऊ नये. आठवड्यातला एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठवण्याच्या टाक्या आणि भांडी पूर्ण मोकळी करून नंतर ती भरावीत. साधारणतः साधा ताप हे डेंगीचे लक्षण असते म्हणून ताप आला की तो अंगावर काढू नका आणि मनाने तापाची औषधे घेऊ नका.

Leave a Comment