आता सनी लियोनवर एमएमएस बनणार

‘रागिनी एमएमएस’ हा बहुचर्चित सिनेमा डायरेक्टर एकता कपूरने कुठल्याही स्टार कलाकारच्या मदतीविना तयार केला होता. तरी पण हा सिनेमा मार्केटमध्ये चांगला चालला होता. हा सिनेमा सक्सेस झाल्याचे पाहूनच एकताने या सिनेमाचा पुढचा पार्ट बनविण्याची तयारी सुरु केली असून त्यासाठी तिने पोर्न स्टार सनी लियोनला साइन केले आहे

तसे पाहीले तर सनी आणी एकताच्या या सिनेमा बाबत खूप दिवसापासून चर्चा ऐकावयास मिळत आहे, मात्र हे कन्फर्म आता झाले आहे. ‘रागिनी एमएमएस 2’ या बहुचर्चित सिनेमाचे शूट पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सुरु होणार आहे. हा सिनेमा ‘ १९२० ईविल रिटर्न्स’ चे डायरेक्टर भूषण पटेल डायरेक्ट करणार आहेत.

दरम्यान, या सिनेमाच्या कथेचा प्लॉट अजून ठरलेला नाही. मात्र सनीच्या प्रेजेंसमुळे हा सिनेमा हॉट-शॉट राहील असे वाटत आहे. आतापर्यंत हे पण क्लियर झाले नाही की, सनीचा हा सिनेमा स्टारर असेल की सीक्वल की, ‘राज’ सिनेमाप्रमाणे फ्रेंचाइजी असणार हे अजून ठरलेले नाही. त्यामुळे या सिनेमाबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Leave a Comment