बिपाशा बसूचा हॉलीवूड सिनेमा रखडला

बिपाशा बसू गेल्या काही दिवसापासून तिचा हॉलीवूडच्या ‘सिंगुलैरिटी’ या बहुचर्चित सिनेमाबाबतच सतत बोलताना दिसत होती. या सिनेमाच्या वेळेस ती हिरो असलेल्या जोश हार्टनेट सोबत करीत असलेल्या रोमान्समुळे देखील चांगलीच चर्चेत आली होती. मात्र गेल्या काही दिवसापासून बिपाशाचा हा सिनेमा पैसे कमी असल्याकारणाने रखडला असल्याचे समजते. हा सिनेमा ओवरबजेट झाला असल्याने रखडला असल्याचे समजते. अजून सिनेमाचे काही शूट राहिले असून निर्मात्याकडे पैसे नसल्यने ते थांबविण्यात आली असल्याची माहिती सिनेमाशी संबधित सूत्राने दिली.

‘सिंगुलैरिटी’ हा एक पीरियड सिनेमा आहे. पीरियड सिनेमी हे महागडे असतात. सिनेमाचे बजेट सुरुवातीला ठरवले होते. मात्र आतापर्यंतच्या शूटसाठी हे बजेट खर्च झाले आहे. या सिनेमाला आतापर्यंत ८० कोटीपेक्षा अधिक पैसे खर्च झाले आहेत. सध्या पैसे कमी पडले असल्याने उर्वरित सिनेमाचे शूट पूर्ण होणे अवघड आहे.

या सिनेमात बॉलीवूडमधील अभय देओल, अतुल कुलकर्णी आणि मिलिंद गुणाजी ही देखील काम करीत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन डायरेक्टर रोनाल्ड जॉफ करीत आहे. गेल्या काही दिवसापासून या सिनेमाचे शूटिंग रखडल्यापासून बंगाली ब्यूटी बिपाशा बसू ही खूप निराश झाली आहे. तिने या सिनेमाच्या प्रमोशनची सुद्धा तयारी केली होती. मात्र तिचे हे स्वपन हे स्वपनच राहिले आहे त्यामुळे सध्या ती काहीसी चिंतीत आहे.

Leave a Comment