करीना आणि इम्रान खानची पाठशाळा

वसंत ऋतु आणि वैलेंटाइंस डेचे लवकरच आगमन होणार असल्याने याचा फायदा घेण्याचे सिनेमातील स्टार मंडळीने अजून काही ठरवले नाही. मात्र यूटीवी स्टार्स चैनलने वैलेंटाइंस डेच्या या मुहूर्तावर रिलीज होणा-या ‘एक मैं और एक तू’ या सिनेमामातील कलाकर करीना कपूर आणि इमरान खान यांना घेऊन एक गेम शो आयोजित केला आहे.

यूटीवी स्टार्सने ‘वैलेंटाइन बॉल’ नावाच्या या शोसाठी युवकाना निमंत्रण दिले आहे. या शोच्या माध्यमातून ही युवा मंडळी वैलेंटाइंस डेच साजरा करणार नाही तर नशिबाने साथ दिली तर ते एक जीवन साथी सुद्धा शोधू शकणार आहेत. या खास शोसाठी ३० युवकाची निवड करण्यात आली आहे. या शोमध्ये त्यांना त्यांचा सहकारी निवड करण्याची आणी त्यांचे ट्यूनिंग जाणून घेण्याची संधी सुद्धा प्राप्त होणार आहे. दोघांना एकमेकांचा साथ किती जुळतो हे या शोच्या माध्यमातून ओळखता येणार आहे. त्यासाठीच निर्मात्याने खास संधी देण्याची योजना देखील तयार केली आहे.

या संधीच्या माध्यमातून दोघांना एकमेकांना इंप्रेस करता येणार आहे. त्याशिवाय स्पीड डेटिंगमुळे त्यांना एकमेकाच्या जवळ जाता येणार आहे. या शोच्यावेळी त्यांना प्रेमाचा मंत्र देण्यासाठी करीना कपूर आणि इमरान खान हे उपस्थित राहणार आहेत. इम्रान आणि करीनाच्या उपस्थीतीमुळे हा शो आणखीनच बहरदार होणार आहे.