उद्धव ठाकरे यांच्यावर यशस्वी हृदयशस्त्रक्रिया

मुंबई: शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी दुसरी हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचे लीलावती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे रविवारी सकाळी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या काही शारीरिक तपासण्या करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी त्यांचे चुलत बंधू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील रुग्णालयात उपस्थित होते.

या शस्त्रक्रियेनंतर तीन दिवस उद्धव यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी जुलाई महिन्यात त्यांच्यावर पहिली हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Leave a Comment