
मुंबई दि. ३ – शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर या महिन्यात पुन्हा अॅजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उद्धव यांना त्रास होऊ लागल्याने जुलै महिन्यात लिलावती रूग्णालयात अॅजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली गेली हेाती तेव्हाच डॉक्टरांनी पुन्हा एकदा ही शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले होते. त्यानुसार आज म्हणजे ३ नोव्हेंबरला ही शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र सध्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तब्येत बरी नसल्याने ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असली तरी ती याच महिन्यात केली जाणार आहे.
