लडाख भागात लष्कराने टिपल्या उडत्या तबकड्या

नवी दिल्ली दि.३ – लडाख भागात १ ऑगस्ट ते १५ आक्टोबर या काळात किमान १०० उडत्या तबकड्या दिसल्याचा रिपोर्ट इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्सने दिल्लीतील मुख्यालयाकडे पाठविला असून या भागातील लष्करी अधिकार्यां नीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पँगाँग लेकजवळ असलेल्या थाकुंग भागात या तबकड्या इंडो तिबेटिन पोलिस आणि लष्कराने पाहिल्या आहेत. त्यासंबंधीचा रिपोर्ट पंतप्रधान कार्यालयालाही करण्यात आला असल्याचे लष्करी अधिकार्यांयनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चिनी हद्दीतील क्षितिजावरून आकाशात येणार्या‍ पिवळसर रंगाच्या प्रकाशमान तबकड्या तीन ते पाच तास आकाशात दिसत असून नंतर त्या नाहिशा होत आहेत.

या वस्तू म्हणजे मानवरहित यूएव्ही अथवा ड्रोन किंवा पृथ्वीच्या कक्षेत कमी उंचीवरून जाणारे उपग्रह नाहीत याची खात्री लष्कराने दिली आहे. आर्मी अधिकार्यां नी या तबकड्यासदृश वस्तूंचे फोटोही घेतले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ड्रोन विमान लगोलग ओळखता येतात. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान चीनी हद्दीत आलेली ९९ ड्रोन विमाने रडारने टिपली आहेत. सप्टेंबरमध्येच लष्कराने या भागात मोबाईल रडार बसविले असून त्यावर १६० किमी दूरवरची कोणत्याही फ्रिक्वेन्सीची वस्तू अचूक टिपली जाते. मात्र सध्या दिसत असलेल्या या उडत्या वस्तू रडार टिपू शकलेले नाही म्हणजे या वस्तू धातूच्या नसाव्यात. प्रत्यक्ष डोळ्याला दिसत असतानाही त्यांची रडारवर नोंद झाली नाही.

लष्कराने या वस्तूंच्या मागावर भारतीय ड्रोन विमाने रवाना केली पण त्याचा कांहीही उपयोग होऊ शकला नाही असेही सांगण्यात येत आहे.

Leave a Comment