बॉसने स्मित केले, तर सावध व्हा!

लंडन – तुमचा बॉस तुमच्याकडे बघून स्मित करतो ? याचे उत्तर होय असेल तर वेळीच सावध व्हा. बॉसचे हे स्मित सकारात्मक किंवा मैत्रीपूर्णच असेल, असे सांगता येत नाही. अलीकडच्या संशोधनानुसार जे लोक स्वतःला शक्तिशाली समजतात, ते महत्वाच्या लोकांना पाहून स्मित करीत नाहीत . ते समोरच्या व्यक्तीचे पद लक्षात घेऊन स्मित करतात. 

यूनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्नियामध्ये झालेल्या या संशोधनात ५५ युवक आणि महिलांना ते स्वतःला जेव्हा शक्तिशाली समजतात त्या वेळेबाबत लिहिण्यास सांगितले. अध्ययनात असे आढळले की, जे पुरुष आणि महिला स्वतःला शक्तिशाली समजतात, ते उच्चाधिकार्‍यांकडे पाहून स्मित करीत नाहीत. मात्र आपल्या हाताखाली असणार्‍या कर्मचार्‍यांना पाहून स्मित करतात. कारण ते शक्तिहीन असतात. 

संशोधकांच्या मते, जे लोक स्वतःला शक्तिशाली समजतात ते त्यांना धोका असेल अशा लोकांशी जास्त मैत्री ठेवत नाहीत. मात्र आपल्या खालच्या पदावर असणार्‍यांचा त्यांना कोणताही धोका नसतो तेव्हा ते त्यांच्याकडे पाहून स्मित करतात. हा शोध अहवाल सोसायटी फॉर न्यूरोसाइंसच्या वार्षिक संमेलनात न्यू ओरलियोंसमध्ये सादर करण्यात आला. या प्रवृत्तीमागे आपल्यापेक्षा सीनियरशी औपचारिक आणि कनिष्ठाशी अनौपचारिक वर्तन लोकाचार असल्याचे मानले जाते. अर्थात, बॉसचे अकारण सतत स्मित करून पाहणे फारसे गंभीरतेने न घेण्याचादेखील संकेत असतो.

 

Leave a Comment