अभय करणार रोमेंटिक रोल

‘शंघाई’ या सिनेमात एक ब्यूरोक्रेटचा रोल करणा-या अभय देओलने ‘चक्रव्यूह’ मध्ये चांगला रोल केला आहे. डायरेक्टर प्रकाश झाच्या ‘चक्रव्यूह’ मधील रोलमुळे अभय सध्या चर्चेत आला आहे. या सिनेमतील त्याच्या रोलला मिळत असलेला रीस्पोंस बघून सध्या अभय मात्र खुश आहे.

याबाबत बोलताना अभय म्हणाला, ‘ ‘चक्रव्यूह’ मधील रोलला नागरिकाने पसंत केले आहे. त्यासोबतच मीडिया देखील याबाबतीत माझा साथ देत आहे. जरी काही समीक्षाकाना हा सिनेमा आवडला नसला तरी प्रेक्षकांना हा सिनेमा आवडला आहे. त्यामुळे माझा प्रेक्षकावर विश्वास आहे. मी समीक्षाकानी दिलेल्या स्टारवर विश्वास ठेवत नाही. प्रेक्षकांना आवडतो तो सिनेमा ते जरूर पाहतात ते कशाकडेच लक्ष देत नाहीत.’

‘चक्रव्यूह’ मधील रोलबद्दल बोलताना अभय म्हणाला, ‘मला अशा प्रकारचे रोल करण्यास आवडतात, मला या सिनेमातील कैरेक्टर पसंद पडले त्यामुळे हा सिनेमा मी स्वीकारला. या पुढील काळात जर रोमांटिक सिनेमात काम करण्याची संधी मिळाली तर मला अशास्वरूपाच्या सिनेमात काम करण्यास आवडेल.’