चोरट्यांनी लांबविले १० किलो सोने

पुणे: रास्ता पेठेतील जे.के.ज्वेलर्स या सराफी दुकानातून गुरुवारी रात्री चोरट्यांनी सुमारे १० किलो सोने लुटले. सी सी टीव्ही फुटेजसह दरोडेखोरांनी पोबारा केल्याने पोलिसांसाठी कोणताही माग मागे राहिलेला नाही.

दुकानाचे मालक दुकानाच्या वराच्य मजल्यावरच राहतात. गुरुवारी रात्री ते दुकान बंद करून जवळच राहणाऱ्या आपल्या मुलाच्या घरी जेवण्यासाठी गेले. ते जेऊन परत येण्यापूर्वीच चोरट्यांनी दुकानाच्या मागचे लाकडी दार तोडून दुकानात प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने पळवून नेले. मात्र चांदीच्या एकाही दागिन्याला त्यांनी हात लावलेला नाही.

चोरीची वेळ आणि प्रवेश करण्याचे ठिकाण पाहता दुकानाच्या रचनेची माहिती असलेल्यानेच ही चोरी केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

Leave a Comment