सर्वाधिक गुन्हेगार राष्ट्रवादीचे: माणिकराव ठाकरे

डहाणू: सत्तेत एकत्र राहून प्रत्यक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नाते विळ्या- भोपळ्याचे आहे; याचा जाहीर प्रत्यय हल्ली वारंवार येत आहे. अनुदानित सिलेंडर्सची संख्या न वाढविल्यास आंदोलनाची धमकी देणार्या राष्ट्रवादीला; राज्यात सर्वाधिक गुन्हेगार राष्ट्रवादीचे असल्याचा आरोप करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी टोला लगावला आहे.

डहाणू नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचारसभेत ठाकरे बोलत होते.
अनुदानित सिलेंडर्सची संख्या वाढविण्याची मूळ भूमिका काँग्रेस नेतृत्वाचीच असून राष्ट्रवादी केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी आंदोलनाच्या पोकळ बढाया मारत आहे; अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Leave a Comment