ऐश्वर्याच्या बर्थ-डेसाठी अभिषेकने घेतला ब्रेक

आज ऐश्वर्या राय- बच्चनचा ३८ वा बर्थ-डे आहे. त्यामुळे तिचा हा वाढदिवस बच्चन परीवारासाठी खास असल्याने त्यानिम्मित वेगवेगळ्या कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्याचा तिची मुलगी अराध्यचा जन्म झाल्यानंतरचा पहिलाच वाढदिवस असल्याने धामधूम करीत तिचा हा बर्थ-डे साजरा करण्यात येणार आहे. तिच्या बर्थ-डेसाठी अभिषेक बच्च्चन धूम -३ सिनेमाची शुटींग सोडून शिकोगोतून भारतात दाखल झाला आहे.

अभिषेकने आपल्या पत्नीच्या बर्थ-डेमूळे शिकागोमधून इंडियात परत आला आहे. मिसेजच्या बर्थ-डेच्या धूम साठी त्याने ‘धूम -3’ सिनेमाच्या शूटिंगला ब्रेक दिला आहे. यानिम्मित संपूर्ण बच्चन परिवार आज गोव्यामध्ये एकत्रित येत आहे. याठिकाणी सर्वजन एकत्रित येऊन तिचा बर्थ-डे साजरा करणार आहेत.

गोवा म्हणजे बच्चन परिवारासाठी फेवरिट हॉलिडे डेस्टिनेशन आहे. काही दिवसापूर्वी बीग-बी अमिताभ बच्चन परिवारासह गोव्यात सुट्टीसाठी गेले होते. यावेळेस मात्र सुट्टीसाठी त्यांच्याकडे जास्त दिवस नसल्याने केवळ दोनच दिवस ते येथे थांबणार आहेत. धूम-३ च्या शूट मधून अभिला केवळ दोन दिवस सुट्टी मिळाली आहे. त्यामुले त्यांचा कार्यक्रम व्यस्त असणार आहे.

Leave a Comment