इमरान हाश्मी करणार हॉलीवूडच्या सिनेमात काम

सध्या हॉलीवूडच्या सिनेमात काम करयाची बॉलीवूड मधील स्टार मंडळीत स्पर्धा लागली आहे असे दिसते. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून अनेक जनाचा कल हॉलीवूडमधील सिनेमात काम करण्याकडे दिसत आहे. आता अभिनेता इमरान हाश्मी देखील हॉलीवूडच्या सिनेमात झळकणार आहे.

इमरान हाश्मीने ऑस्कर पुरस्कार विजेता डायरेक्टर डेनिस तानोविकच्या आगमी काळात येना-या सिनेमात काम करण्याची ऑफर स्वीकारली असल्याचे समजते. हा सिनेमा सर्वच मोठे प्रोडक्शन हाउस एकत्रित मिळून तयार करणार असल्याचे समजते. यापूर्वी तानोविकने निर्मिती केलेल्या ‘नो मैन्स लैंड’ या सिनेमाच्या स्क्रिप्टला सगळीकडे खूपच लोकप्रियता मिळाली होती. या सिनेमाला २००१ सालचा सर्वश्रेष्ठ विदेशी भाशेतील सिनेमा म्हणून आस्कर अवार्ड मिळाला होता. त्यावेळी या श्रेणीत आशुतोष गोवारिकरचा ‘लगान’ हा सिनेमा सुद्धा होता.

तानोविकने दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात त्याच्या येत असलेल्या हॉलीवूडच्या सिनेमात काम करण्यास इम्रान हाश्मीने होकार दिला आहे. काही दिवसापुर्वीच इम्रानने तानोविकने दिग्दर्शित केलेले सिनेमे पाहून त्यंच्या सोबत काम करण्यची इच्छा व्यक्त केली होती.