सलमान खान करणार नाही करीनाला टच

आगामी काळात येत असलेल्या ‘दबंग-२ ‘ सिनेमामधील आयटम सॉन्ग मध्ये सलमान खान करीनाला साधे टचही करणार नाही. हे ऐकून सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला असेल, मात्र हे खरे आहे. करीनाला टच न करता या गाण्यात सलमान खान थिरकणार आहे. हा सर्व प्रकार सलमानच्या मर्जीने होत असल्याचे समजते.

कुठल्याही सिनेमात आयटम सॉन्ग हे सिनेमाला हॉट करण्यासाठी सदर केले जाते. त्यामुळेच या गाण्यात सर्वाधिक हॉट सीन दिसतात. मात्र  ‘दबंग-२ ‘ मधील हे आयटम सॉन्ग जरा हटके आहे. या सिनेमात सलमान-करीना ‘फेविकोल’ सॉन्गवर थिरकणार आहेत. बेबोचे लग्न झाल्यानंतर ती पहिल्यादाच या गाण्यातून स्क्रीनवर दिसणार आहे.

या सॉन्गचे शूट ५ नोवेंबरपासून सुरु होणार आहे.  या गाण्याचे  टाइटल ‘फेविकोल’ असे असून करीना आणि सलमान यांच्यात कुठलीच  फिजिकल इंटीमेसी करणार नाहीत.  हे ऐकून पहिल्यांदा करीनाच्या सासरच्या मंडळींनी काही अट घातली असेल  असे वाटले होते.  मात्र त्यांनी  ‘डू और डॉन्ट’ ची  लिस्ट तयार केली नाही , मात्र  यामागे सलमानच्या  इंस्ट्रक्शंस असल्याचे समजल्याने सर्वाना धक्का बसला.

सिनेमाच्या  यूनिटमधील सोर्सने दिलेल्या माहितीनुसार सलमाननेच कोरियॉग्राफ़र फराह खानला बेबोसोबत इंटीमेट अथवा टच करणारे सीन देणार नाही असे सांगितले होते.  करीना जरी आज सुपरस्टार असली तरी सलमान आज ही तिला  करिश्माची  छोटी बहीन समजतो.  त्यामुळेच सलमान क्लोज़ सीन करायला तयार नाही.  ‘दबंग’ मध्ये ‘मुन्नी बदनाम हुई…’ या आयटम सॉन्ग मध्ये ही सलमानने मलाइका सोबत असे सीन केले नव्हते. त्याशिवाय सुद्धा हे सॉन्ग पॉप्युलर झाले होते.

Leave a Comment