‘सन ऑफ सरदार’ होणार दिवाळीतच रिलीज

अजय देवगणने त्याचा बहुचर्चित ‘सन ऑफ सरदार’ हा सिनेमा दिवाळीतच रिलीज करण्याचे ठरविले आहे. हा सिनेमा दिवाळीनंतर रिलीज व्हावा म्हणून अनेकानी त्याच्याकडे विनवणी केली होती. मात्र त्याने पूर्वी ठरल्या प्रमाणे हा सिनेमा दिवाळीत रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमाचे पोस्ट प्रोडक्शनचे थोडे काम राहिले असून त्यानंतर लगेचच प्रमोशनचे काम सुरु करण्यात येणार आहे.

या सिनेमाच्या प्रदर्शनला केवळ १२ दिवस शिल्लक आहेत. अजय देवगनवर गेल्या काही दिवसापासून दबाव आणला जात होता. यश चोपडा यांना ट्रिब्यूट देण्यासठी त्याने ‘सन ऑफ सरदार’ चे प्रदर्शन पुढे ढकलावे म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. मात्र अजय देवगन त्यासाठी शेवटपर्यंत तयार झाला नाही.

अजय देवगन च्या सिनेमासोबत यश चोपडाने निर्देशित केलेला सिनेमा “जब तक है जान” हा रिलीज होणार आहे. “सन ऑफ सरदार” सिनेमाच्या बिजी शेड्यूलमुळे अजय हा यश चोपडाच्या निधनानंतर गेला नव्हता. अजयचे चोप्रा कैंप सोबत संबध चांगले नसल्याने तो गेला नसलायचे समजते. मात्र त्याने पत्नी काजोल आणि यश चोपडा यांच्यातील संबध कधीच बिघडू दिले नहित.

Leave a Comment