मुख्यमंत्र्यावर स्लिपर फेकण्याचा प्रयत्न फसला

सोलापूर दि.२९ –  सोलापूर जवळच्या सिताराम महाराज साखर कारखान्याच्या सभेत भाषण करणार्याव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दिशेने चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांच्या दक्षतेने फसला. हे कृत्य करणारा महेश केदार हा शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असून त्याला सुरक्षा रक्षकांनी त्वरीत ताब्यात घेऊन सोलापूर पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याचे समजते.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री चव्हाण या कारखान्याच्या सार्वजनिक सभेत काल म्हणजे रविवारी भाषण करत असतानाच केदार याने उस उत्पादक शेतकर्यांमना चांगला दर द्यावा यासाठी घोषणाबाजी सुरू केली. त्याचवेळी पायातील चप्पल काढून त्याने व्यासपीठाच्या दिशेने फेकली. मात्र तेथे तैनात असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तीक सुरक्षा रक्षकाच्या लक्षात ही बाब वेळीच आली आणि त्याने ताबडतोब कृती करून चप्पल हिसकावून घेतली. सभेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था होती मात्र केदार याने पत्रकारांच्या गर्दीतून व्यासपीठाजवळ प्रवेश केला असे सांगण्यात आले.

या घटनेने विचलित न होता मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण पुढे सुरू ठेवले व कार्यक्रम संपवून नंतर ते दुसर्याु कार्यक्रमासाठी नागपूरला रवाना झाले असे समजते.

Leave a Comment