कर्मचार्यांना यंदा चांगला बोनस मिळण्याचे संकेत

नवी दिल्ली दि.२९ –  केंद्र सरकारने अवलंबिलेले आर्थिक सुधारणांचे धोरण आणि एकूण उद्योग व्यवसायांत झालेली वाढ पाहता खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचार्यां ना यंदा दिवाळीचा चांगला बोनस मिळेल असे माय हायरिंगक्लब डॉट कॉम या सल्ला संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून येत आहे.

बर्या्च खासगी कंपन्या आपल्या कर्मचार्यां ना १ महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्याचा विचार करत आहेत तर अन्य अनेक कंपन्यांत कांही ठराविक रक्कम बोनस म्हणून देण्याचा विचार सुरू आहे. खासगी कंपन्यांतील ९५ टक्के कंपन्या  बोनस देणार आहेत.खासगी  क्षेत्रातील ३२ टक्के कंपन्या १ महिन्याचा पगार बोनस म्हणून देणार आहेत. २९ टक्के कंपन्या ठराविक रक्कम बोनस म्हणून देणार आहेत तर ३९ टक्के कंपन्या पगार पॅकेजच्या पाच ते सहा टक्के बोनस देणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील ६३टक्के कंपन्या महिन्याचा पगार तर ३७ टक्के कंपन्या ठराविक रोख रक्कम देणार आहेत असे या सर्वेक्षणात आढळले आहे.

यंदा मंदीचे वारे वाहात असूनही वाहन उद्योग, सेवा उद्योग आणि रिटेल उद्योगांनी चांगला व्यवसाय केला आहे. सुधारणावादी धोरणाचे फायदे उद्योगांना नक्कीच होत असून पुढील महिन्यापासून रोजगारांच्या अनेक संधीही उपलब्ध होऊ लागणार आहेत. परिणामी आपल्या कंपनीतील कर्मचारी टिकविण्यासाठी कंपन्या दिवाळी बोनस देताना फारशी घासाघीस करणार नाहीत असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.