’भारतात श्रीमंती लपवून ठेवण्याची गोष्ट’

नवी दिल्ली,२९ ऑक्टोबर-श्रीमंती ही भारतात लपवून ठेवण्याची बाब आहे, असे मत उद्योगपती आणि किंगफिशरचे एअरलाइन्सचे मालक विजय माल्ल्या यांनी व्यत्त केले आहे.

विजय माल्ल्या यांनी टवीट करताना लिहले की, ’मला वाईट अनुभव आल्यानंतर मला लक्षात आले आहे, भारतात पैशांचे प्रदर्शन नको, या पेक्षा या देशात खादी वेशात करोडपती नेता होणे बरे आहे.’

विजय माल्ल्यांच्या मते, भारतात श्रीमंती ही लपवून ठेवण्याची गोष्ट आहे. या देशात खादीच्या कपड्यात कोट्यधीश नेता असणे, बरे समजले जाते.
विजय माल्ल्या यांनी काही दिवसांपूर्वी टवीटवर लिहले होते, आता ’माझा अब्जाधीशाचा दर्जा राहिलेला नाही, त्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. कारण यामुळे आता तरी माझा द्वेष कमी होईल, ही अपेक्षा आहे. विजय माल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्स कंपनीला मागील काही दिवसांपासून घरघर लागली आहे.