सध्या ‘स्टूडेंट ऑफ द इयर’ या सिनेमातील ‘राधा…’ हे गाणे सर्वत्र चर्चेचा विषय झाले आहे. हे गाणे सर्वांच आवडले असल्याने कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर हेच गाणे ऐकावयास मिळत आहे. सर्व तरूणाइच्या तोंडात पण हेच गाणे गुणगुणताना दिसते. त्यामुळे या गाण्याला बिग बी अमीताभ बच्चनचा कसा अपवाद असणार ते पण या गाण्याचे सध्या दिवाने झाले आहेत.
काही दिवसापुर्वी दुर्गापूजेसाठी बिग बी बच्चन आपल्या कुटुंबासोबत जेवण करण्यासाठी बाहेर गेले होते. मात्र यावेळी रस्त्यवर गर्दी असल्याने त्यांची गाडी काही काळ ट्राफिकमध्ये अडकली होती. त्यावेळी गाडीत बसल्यानंतर ते ‘स्टूडेंट ऑफ द इयर’ या सिनेमातील ‘राधा…’ हे गाणे वारंवार ऐकत होते. हे गाणे वारंवार ऐकल्याने मनाला प्रसन्न वाटत होते असे, बिग बी ने त्यांच्या ट्विटरवर ट्विट केले आहे.
यावेळी मुंबई मधील ट्रफिक एवढे जाम झाले होते की, यामधून मार्ग काढन्यासाठी शेवटी मदतीला पोलिसाला बोलवावे लागले. त्यामुळे रात्री घरी पोहचण्यासाठी त्यांना बराच उशीर झाला. मात्र ‘स्टूडेंट ऑफ द इयर’ या सिनेमातील ‘राधा…’ हे गाणे ऐकल्याने प्रवासनंतर देखील त्यांना बओर मात्र झाले नसल्याचेही त्यांनी ट्विट केले आहे.