रश – इमरानच्या चाहत्यांची निराशा

तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता हे फार महत्त्वाचे नाही. मग ती फिल्म इंडस्ट्री असो, उद्योग जगत असो किंवा न्यूज मीडिया असो, प्रत्येक क्षेत्रात एक तरी स्टार हा असतोच.रश या सिनेमातील मुख्य भूमिकेत असलेला इम्रान क्राईम रिपोर्टर आहे. हा रिपोर्टर प्राईम टाईम शो होस्ट करतो. आपल्या कार्यक्रमात तो गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी दाखवत असतो. कदाचित या चित्रपटाचे बजेट या न्यूज चॅनलच्या मालकाचे हायप्रोफाईल आयुष्य दाखवण्यात कमी पडले असावे. त्यामुळे कदाचित चॅनलचा मालक (आदित्य पंचोली) गोव्यातच पार्टी सेलिब्रेट करत असावा किंवा जास्तीत जास्त कुआलालंपूरमध्ये जात असावा .

असो, या सिनेमातील पत्रकार प्रसिद्ध असून हिरोपेक्षा कमी नाही. इमरान हाश्मीने या सिनेमात क्राईम रिपोर्टरची भूमिका साकारली आहे. प्रत्येक सिनेमात असतो अगदी त्याप्रमाणे याही सिनेमात व्हिलन आहे. ५०च्या दशकात जमीनदार व्हिलनच्या भूमिकेत दिसायचे. पुढे ७०च्या दशकात दहशतवादी व्हिलनच्या भूमिकेत दिसू लागले. आताच्या सिनेमांमध्ये न्यूज मीडिया ही भूमिका वठवत आहे.

सिनेमा पाहताना आपण दुसर्‍याच जगात असल्यासारखे वाटते. कारण येथे पोलिस नाही, कायदे नाहीत. आहे तो फक्त टीआरपी. टेलिव्हिजन रेटिंग जगावर अधिकार गाजवताना दिसतात. सिनेमात न्यूज चॅनलचा ’एडिटर इन चार्ज’ एका जाळ्यात अडकला आहे. हा एडिटर कोणत्या कारणांमुळे अडचणीत सापडला हे जेव्हा सिनेमात उघड होतं तेव्हा आपल्याकडे हसण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. इमरान हाश्मीच्या चाहत्यांनी निराशा झाली आहे. कारण सिनेमात सेक्स नाही. फक्त आहेत ती भरमसाठ सुफी गाणी .

 

Leave a Comment