गुजराथ निवडणूक प्रचारांत गडकरींना टाळण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली दि.२७ – दिवसेनदिवस पूर्ती उद्योग समूहातील घोटाळ्यात अधिकाधिक अडकत चाललेल्या भाजप अध्यक्ष नितिन गडकरी यांना डिसेंबरमध्ये गुजराथेत होत असलेल्या निवडणूक प्रचारसभांत शक्यतो न उतरविण्याचा विचार केला जात असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. गडकरींवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप पाहता गुजराथेत काँग्रेस नरेंद्र मोदींना या मुद्द्यावरून अडचणीत आणेल असा इशाराही प्रचार मोहिम राबविणार्‍यांनी दिला आहे असेही सांगण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या स्टार प्रचारक यादीत वास्तविक गडकरींचे नांव सर्वप्रथम होते. मात्र आता गडकरींऐवजी लालकृष्ण आडवानी यांना स्टारप्रचारक म्हणून आणले जाणार असून भाजपचे अन्य वरीष्ठ नेते, सुषमा स्वराज, अरूण जेटली, शिवाय भाजपची सरकारे असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री निवडणूक प्रचारात उतरणार आहेत. स्वतः मोदी झंझावाती प्रचार मोहिम राबवित आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर व भाजपचे वरीष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हेही गुजराथेत प्रचारसभा घेणार आहेत. मात्र या सार्‍या गदारोळात नितीन गडकरींना मात्र दूरच ठेवले जाणार आहे  असे समजते.

 

Leave a Comment