
नवी दिल्ली,२६ ऑक्टोबर-कोळसा घोटाळ्यासंदर्भातील बातमी न दाखवण्यासाठी झी न्यूज चॅनले शंभर कोटी मागितले, असा आरोप काँग्रेसचे खासदार आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांनी केला आहे. नवी दिल्लीमध्ये आज पत्रकार परिषद घेऊन त्यांना हा आरोप केला.

नवी दिल्ली,२६ ऑक्टोबर-कोळसा घोटाळ्यासंदर्भातील बातमी न दाखवण्यासाठी झी न्यूज चॅनले शंभर कोटी मागितले, असा आरोप काँग्रेसचे खासदार आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांनी केला आहे. नवी दिल्लीमध्ये आज पत्रकार परिषद घेऊन त्यांना हा आरोप केला.
या पत्रकार परिषदेत जिंदाल यांनी झी न्यूजच्या संपादकांसोबत झालेल्या चर्चेचा व्हिडीओदेखील दाखवला. कोळसा घोटाळा प्रकरणात झी न्यूज आमच्या कंपनीविरोधात चुकीची बातमी दाखवत होती. यासंदर्भात आम्ही न्यूज चॅनलसोबत बातचीत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आमच्याकडे २० कोटींची मागणी केली. नंतर ही रक्कम वाढवून शंभर कोटी करण्यात आली, असे जिंदाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
१३, १७ आणि १९ सप्टेंबर रोजी झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांच्याशी कंपनीच्या काही कर्मचार्यांची चर्चा झाली. या चर्चेत चॅनलने त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केली, असा आरोप जिंदाल यांनी केला आहे. चॅनलसोबत झालेली बातचीत रेकॉर्ड करण्यात आली आणि तो व्हिडीओ आज पत्रकार परिषदेत दाखवण्यात आला.
दरम्यान, चॅनलला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया झी न्यूजने दिली आहे. नवीन जिंदाल यांनी आपल्याला खरेदी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही आणि त्यामुळेच जिंदाल यांनी हा कट रचला, असे चॅनलतफर्े सांगण्यात आले आहे.
घोटाळ्यासंदर्भातील बातमी न दाखवण्यासाठी झी न्यूजने त्यांच्याकडे १०० कोटी रुपये मागितले. पैसे न दिल्यास आपल्याला बदनाम करण्याची धमकी दिली, असे जिंदाल यांचे म्हणणे आहे. शिवाय यासंदर्भात जिंदाल यांनी दिल्ली पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
दरम्यान, १.८६ लाख कोटींच्या कोळसा घोटाळ्यात जिंदाल यांच्या कंपनीचेही नाव आहे.