मायक्रोसॉफ्ट सरफेसच्या किंमती जाहीर

ग्राहकांना प्रतीक्षा असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या सरफेस आरटी टॅब्लेटच्या किंमती जाहीर करण्यात आल्या असून या किंमती ठरविताना अॅपलच्या किमतींच्या तुलनेत त्या कमी असतील याची खास दक्षता घेण्यात आली आहे. यूएस स्टोअर मध्ये या टॅब्लेटच्या ३२ जीबी व्हर्जनची किंमती विदाऊट टचकव्हर ४९९ डॉलर्स तर कव्हरसह ५९९ डॉलर्स जाहीर केली गेली आहे. ६४ जीबी व्हर्जन ६९९ डॉलर्सला विकले जाणार आहे.

या सरफेसच्या प्रीऑर्डर बुकींगला सुरवात झाली असून २६ आक्टोबरपासून त्यांची डिलिव्हरी दिली जाणार आहे.

अॅपलचा न्यू आयपॅड वायफायसह १६ जीबीचा ४९९, ३२ जीबीचा ५९९ तर ६४ जीबीचा ६९९ डॉलर्सला विकला जात आहे. मायक्रोसोफ्टने त्यांच्या सरफेसच्या ३० ते ५० लाख युनिट उत्पादनाची ऑर्डर गेल्या महिन्यात आशियाई उत्पादकांना दिली आहे. अॅमेझॉन किंडल फायर व गुगल नेक्सस यांच्याशीही मायक्रोसॉफ्टला टक्कर द्यावी लागणार असून या दोन कंपन्यांनीही ३० ते ५० लाख युनिट उत्पादनाची ऑर्डर उत्पादक कंपनीला दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.