न्यूयॉर्क: आर्थिक सेवाक्षेत्रातील जगात सर्वात मोठी कंपनी असलेल्या सिटी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पंडित यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारून कंपनीच्या युरोप, मध्यपूर्व आणि आफ्रिका विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल कोर्बर्ट यांची त्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.
मूळ भारतीय वंशाचे; नागपूरकर असलेल्या पंडित यांनी सन २००७ मध्ये जगातील सर्वात मोठ्या आर्थिक सेवा संस्थेच्या प्रमुख पदी विराजमान होण्याचा मान प्राप्त केला. संस्थेच्या गुंतवणूक विभागाच्या प्रमुख पदावर काम करीत असलेल्या पंडित यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संस्थेला तोट्यातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान स्वीकारावे लागले. त्यांनी कौशल्याने हे आव्हान पेलले. मात्र मंगळवारी अचानकच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्याबरोबर कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जॉन हेवन्स यांनीही राजीनामा दिला.