चीन आघाडीवर की भारत ?

china

भारत आणि चीन या दोन देशांत नेहमीच तुलना होत आली आहे. जागतिक पातळीवर श्रीमंतीच्या बाबतीत काही नव्या अभ्यासाचे निष्कर्ष प्रसिद्ध होतात तेव्हा चीन आघाडीवर असल्याचे उघडपणे दिसून येते. असे असले तरी अनेक तज्ञ असा निर्वाळा देत असतात की भारतात लोकशाही असल्यामुळे शेवटी भारतच पुढे जाणार आहे. या दोन देशांत लक्षाधीशांची संख्या किती आहे आणि कितीने वाढणार आहे याची एक आकडेवारी आता प्रसिद्ध झाली आहे. क्रेडिट सुईस संशोधन संस्थेने ही आकडेवारी दिली आहे. तिच्यानुसार भारतात सध्या एक लाख ५८ हजार लक्षाधीश आहेत. चीनमध्ये सध्या ही संख्या १० लाख आहे. या ठिकाणी लक्षाधीशी ही डॉलर्समध्ये मोजली जात असते. 

२०१७ पर्यंत म्हणजे आगामी पाच वर्षात भारतातली लक्षाधीशांची भारतातली संख्या ८४ हजारांनी वाढून दोन लाख ४० हजार होईल असा सुईस या संस्थेचा अंदाज आहे. ही गोष्ट आपणास आनंदाचीच वाटणार पण  या बाबतीत चीन पुढच्या पाच वर्षातही आपल्यापेक्षा फारच आघाडीर राहणार आहे. भारतातल्या लक्षाधीशांची संख्या  २.४० लाख होईल तेव्हा चीनमध्ये ती २० लाख होईल. पण चीन याबाबत भारताच्या जवळपास आठ पटीने पुढे असणार आहे. आता तो सहा पटीने पुढे आहे. म्हणजे चीनची याबाबतीतली प्रगती भारतापेक्षा वेगवान राहणार आहे.

चीनमधील श्रीमंतांची संख्या मोठी आहे आणि ती मोठी होत आहे पण त्या श्रीमंतांची श्रीमंती कमी होत आहे.अमेरिकेतल्या हृुमत रिच लिस्ट या यादीत चीनच्या या अधोगतीची चर्चा करण्यात आली आहे. चीनमध्ये गेल्या वर्षी २७१ अब्जाधीश होते. यावर्षी ती संख्या २० ने कमी झाली आहे. दूरच्या काळाचा विचार केला तर असे दिसते की २००६ चीनमध्ये केवळ १५ अब्जाधीश होते. त्या मानाने २५१ ही संख्या चांगलीच आहे. असे असले तरीही चीनमधल्या सर्वात श्रीमंत अशा १ हजार लोकांची संपत्ती कमी होत आहे. त्यातल्या ३७ जणांची मालमत्ता तर गतवर्षीपेक्षा ५० टक्के कमी झाली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेला आता मंदीचे वेध लागले असून विकासाचा वेग मंदावायला लागला आहे. त्याचा परिणाम श्रीमंतांच्या संपदेवरही होत आहे. या १ हजार श्रीमंतांची मालमत्ता सरासरी ८६ कोटी डॉलर्स आहे. ती गतवर्षीपेक्षा ९ टक्क्यांनी कमी झालेली आहे. २००८ पर्यंत दहा टक्क्यांनी वाढणारा विकास वेग आता ७.६ टक्क्यांवर खाली आला आहे.

 

Leave a Comment