पणजी: गोव्याच्या विमानतळावर उतरताना भारतीय नौदलाच्या हेलीकॉप्टरने पेट घेतल्याने झालेल्या अपघातात दोघा वैमानिकांसह तिघांचा मृत्यू झाला.

पणजी: गोव्याच्या विमानतळावर उतरताना भारतीय नौदलाच्या हेलीकॉप्टरने पेट घेतल्याने झालेल्या अपघातात दोघा वैमानिकांसह तिघांचा मृत्यू झाला.
नौदलाचे चेतक हे हेलीकॉप्टर गोव्याच्या दाबोलीम विमानतळावर इंधन भरण्यासाठी उतरत असताना त्याचा रोटर तुटला आणि आग लागली. या अपघातात नौदलाच्या दोन वैमानिकांसह तीन जण जागीच ठार झाले. हे हेलीकॉप्टर मुंबईहून मेंगलोर येथे निघाले होते.
यापूर्वी ओगस्ट महिन्यात हवाईदलाच्या दोन हेलीकॉप्टर्सना गुजरातमध्ये अपघात होऊन त्यात ९ जणांचा मृत्यू झाला होता.