वॉशिग्टन दि.१३- अनेक दिवसांपासून बाजारात चर्चा सुरू असलेला अॅपलचा मिनी आयपॅड आणखी दहा दिवसांनी म्हणजेच २३ आक्टोबरला लाँच केला जाईल असे खात्रीलायक वृत्त आहे. नामवंत कंपन्यांच्या स्वस्त आणि मस्त उपकरणांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अॅपललाही आयपॅडचे मिनी व्हर्जन तयार करण्याची आवश्यकताच निर्माण झाली होती असे सांगितले जात असून हे व्हर्जन तुलनेते स्वस्त असेल असेही सांगितले जात आहे.
अॅपलचे प्रतिस्पर्धी मायक्रोसॉफ्ट कॉर्प विंडोज आठ आणि नवीन सरफेस टॅब्लेट आक्टोबर २६ ला बाजारात आणत आहेत. त्यापूर्वीच अॅपल आपले उत्पादन बाजारात उतरवत आहे. हे उत्पादन मिनी आयपॅडच आहे आहे या वृत्ताला अॅपलच्या प्रवक्त्याने दुजोरा दिलेला नाही. मात्र मिनी आयपॅड सात इंची स्क्रीनचा असल्याचे अंतर्गत सूत्रांकडून समजते. या आयपॅडला ई कॉमर्स जायंट अॅमॅझॉनच्या किंडल फायर एचडी टॅब्लेट व गुगलच्या नेक्स ७ शी थेट स्पर्धा करावी लागणार आहे. ही दोन्ही उपकरणे सात इंची स्क्रीनची आहेत आणि त्यांची किमत आहे १९९ डॉलर्स.
यू.एस. टॅब्लेट मार्केटमध्ये किंडर फायरने गतवर्षी चांगलेच वर्चस्व मिळविले असून बाजारात त्यांचा १/५ हिस्सा आहे.