सापाला बघून श्रुती घाबरली

दिग्दर्शक कुमार तोराणीच्या सिनेमाचे शूट सध्या पुण्याजवळच्या जंगलात सुरु आहे. या सिनेमात प्रमुख भूमिका कमल हसनची कन्या श्रुती हसन करीत आहे. यापूर्वी तिने कधीच साप पहिला नसल्याने या शुटच्या वेळी श्रुतीला जंगलात साप दिसला त्यामुळे तीची घाबरगुंडी उडाली होती.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने येथील जंगलात सारखे साप निघत असतात त्यामुळे ही काही नवीन बाब नाही. मात्र श्रुती हसनच्या सिनेमाचे पाहिल्यादच जंगलात शूट सुरु आहे. जंगलाचा परिसर सध्या हिरवाईने गर्द झाला आहे. अशा ठिकाणी सध्या या सिनेमाचे शूट सुरु आहे. या ठिकाणी शूटसाठी कॅमेरा ऑन केल्यानंतर सगळीकडेच साप दिसायला लागल्यामुळे शूट थांबविण्यात आले. या सापाला श्रुती हसन तर खुपच घाबरली. तीने याठीकानाहून काढता पाय घेऊन तिने वॅनमध्येच बसणे पसंद केले.

या ठिकानाहून साप निघून गेल्यानंतर शूटचे काम पुन्हा सुरु करण्यात आले. या सापांनी मात्र कुठ्लेही नुकसान केले नाही. मात्र त्यानंतरही काही काळ श्रुती मात्र घाबरलेलीच होती.

Leave a Comment