मुंबईत सेक्स रॅकेट उद्धवस्त, १५० मुली अटकेत

मुंबई, दि.५ – मुंबईमध्ये सगळ्यात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. दक्षिण मुंबईत सिम्प्लेक्स बिल्डिंगवर आज ८.३० वाजता पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये १५० बांग्लादेशी मुली आणि २०० ग्राहकांना पकडण्यात आले आहे. अप्पर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ही कारवाई केली आहे.

आजवर टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये ही सर्वाधिक मोठी कारवाई आहे. जवळजवळ १ तास हे अटकसत्र सुरू होते. दक्षिण मुंबईच्या डीबी मार्ग पोलिसांनी २०० जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बहुतांशी मुली ह्या अल्पवयीन आहेत.

 

Leave a Comment