महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाची वेबसाईट सुरू

पुणे दि.६ – महाराष्ट्रातील कारागृह विभागाने त्यांची www.mahaprison.gov.in ही वेबसाईट गुरूवारी सुरू केली असून त्यावर टेंडर प्रक्रिया, राईट टू इन्फर्मेशन अॅक्ट अम्मलबजावणी, तुरूंगांची संख्या, तेथील उद्योग व नागरिक व तुरूंग प्रशासन यांतील माहितीची देवाणघेवाण अशा अनेक गोष्टींची माहिती देण्यात आली आहे

महाराष्ट्रात सध्या ९ मध्यवर्ती जेल, २८ जिल्हा जेल, ५ खुली कारागृहे, १ खुली कॉलनी, १७२ उपकारागृहे शिवाय महिलांसाठी दोन स्वतंत्र कारागृहे आणि मुंबई व पुणे येथे खुली कारागृहे आहेत. येरवडा कारागृहात ८ जूनला झालेल्या इंडियन मुजाहिद्दीनचा अतिरेकी कातिल सिद्दीकी याच्या खुनामुळे राज्यात तुरूंगे ही चर्चेचा विषय बनली होती. कारागृहांची वेबसाईट नाही याबाबत अतिरिक्त महासंचालक ऑफ पोलिस मीरण बोरवणकर यांनी आश्चर्यही व्यक्त केले होते. मात्र आता ही वेबसाईट अनेक अधिकार्‍यांच्या सहकार्यातून सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

बोरवणकर म्हणाल्या की या वेबसाईटवर कारागृहांचा इतिहास, कैद्यांची संख्या, तुरूंगातील उद्योगातून उत्पादित होणार्‍या फर्निचर, सतरंज्या गालिचे, हँडलूम वस्तू, बेकरी उत्पादने तसेच खुल्या कारागृहातून पिकविण्यात येणारी शेती उत्पादने यांची माहिती देण्यात आली आहे. कारागृहातील सुरक्षेत वाढ करण्यासाठी सीसीटिव्ही बसविण्याचा प्रस्तावही राज्य सरकारला सादर करण्यात आला असून आर्थर रोड, येरवडा व तळोजा येथे पहिल्या टप्प्यात हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. कारागृहातील पोलिसांना हँड मेटल डिक्टेटर, शस्त्रे तसेच डोअर मेटल डिक्टेटर पुरविण्यासंबंधीचा प्रस्तावही राज्य सरकारला सादर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

3 thoughts on “महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाची वेबसाईट सुरू”

Leave a Comment