कसाबचा सुरक्षा खर्च २७ कोटींवर

मुंबई दि.८- मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कमोर्तब झाले असले तरी त्याने राष्ट*पतींकडे केलेल्या दयेच्या अर्जावरची सुनावणी अद्याप झालेली नाही. परिणामी कसाब अजूनही आर्थर रोड जेलमध्येच आहे आणि त्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या इंडो तिबेट बॉर्डर पोलिस विभागाने कसाबच्या रक्षणापोटी महाराष्ट्र शासनाला २७ कोटी ३२ लाख रूपयांचे बिल पाठविले आहे. कसाबच्या रक्षणासाठी २०० कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

इंडो तिबेट सिक्युरिटी विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे मात्र अजून बिलाची रक्कम मिळाली नसल्याचेही सांगितले आहे. मात्र या बिलासंबंधी केंद्रीय गृहमंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यातच बोलणी होतील सिक्युरिटी विभाग त्यात पडणार नाही असाही खुलासा केला आहे. महाराष्ट्र शासनाला मे महिन्यातच या विभागाने २८ मार्च २००९ ते ३० सप्टेंबर २०१० या काळासाठी ११ कोटी रूपयांचे बिल पाठविले होते.

राज्याच्या गृहविभागाच्या मुख्य सचिव मेधा गाडगीळ यासंबंधी म्हणाल्या की कसाबची सुरक्षा हा राष्ट्रीय प्रश्न असल्याने हे बिल केंद्राने राज्याला माफ करावे अशी विनंती केंद्रीय गृहमंत्रालयाला करण्यात आली आहे मात्र त्याचे अजून उत्तर आलेले नाही.

इंडोतिबेट बॉर्डर सिक्युरिटीतील अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार राज्यांना केंद्राकडून विविध योजनांसाठी जो निधी पुरविला जातो त्यातून हे बिल अॅडजस्ट केले जाईल. म्हणजे महाराष्ट्राला हे बिल कापून घेऊनच उर्वरित निधी दिला जाणार आहे.

 

Leave a Comment