बेबो यापुढे ’करिना कपूर खान’

कपूर आणि खान या दोन आडनावांची बॉलिवूडमध्ये मोठी चलती आहे. यातील एक आडनाव बेबो अर्थात करिनाजवळ असतानाही तिला दुसर्‍या आडनावाने भुरळ घातली आहे. सैफ अली खानसोबत लग्न झाल्यावर करिना आडनाव बदलणार असून तिच्या ’तलाश’ या आगामी चित्रपटात तिचे नाव करिना कपूर खान असे झळकणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानसोबत लग्न करण्यापूर्वीच खान आडनाव वापरण्यासाठी बेबो काहीशी उत्सुक आहे. त्यामुळे आमीर खानची प्रमुख भूमिका असलेल्या तलाशमध्ये तिचे नाव करिना कपूर खान असे दिसणार आहे. बेबोचे करिना कपूर खान असे नाव चित्रपटात दाखविणारा तलाश हा बॉलिवूडमधील पहिलाच चित्रपट असेल.

यासंदर्भात बेबोची आमीर खान आणि रितेश सिंधवानी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांना बेबोचे नाव बदलण्यात काही समस्या नाही. त्यामुळे या चित्रपटात बेबोचे नाव करिना कपूर खान असे झळकण्याचा याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

Leave a Comment