सचिनशिवाय भारतीय क्रिकेटची कल्पना अशक्य- कुंबळे

सगळ्यानाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचे भारतीय क्रिकेटसाठी असलेले योगदान माहिती आहे. त्याच्या २३ वर्षाच्या कारकीर्दीत त्याने अनेक गोलदांची धुलाई केली आहे. सचिनने नोव्हेंबर महिन्यात करियरच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेण्याची घोषणा नुकतीच केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिनशिवाय भारतीय क्रिकेटची कल्पना करणे अशक्य असल्याचे मत भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले .

अनिल कुंबळे याच्या हस्ते एका खेळ अकादमीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तो पत्रकाराशी बोलत होता. पुढे बोलताना अनिल कुंबळे म्हणाला, ‘ स्टार खेळाडू असलेल्या सचिनने गेल्या २३ वर्षाच्या कारकीर्दीत भारतीय संघासाठी दिलेले योगदान महत्वाचे आहे. तो संघासाठी गेल्या कित्येक दिवसापासून आधारस्तंभ म्हणून उभा आहे. मी तर आतापर्यंतची त्याची खेळी कधीच विसरू शकत नाही.’

सचिन व मी ड्रेसिंग रूममध्ये १३ वर्षापेक्षा आधिक काळ एकत्रित व्यतीत केला आहे. त्यामुळे एक दिवस सचिनला निवृत्तीचा निर्णय घ्यावाच लागणार आहे. मात्र निवृत्तीचा निर्णय घेण्याची संधी त्यालाच दिली पाहिजे. त्यावर निर्णय लादण्यात येऊ नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Comment